लेखक

 • अनिल शिदोरे

  डाव्या विचारसरणी ने विद्यार्थी जीवनात प्रभावित झालेले श्री. अनिल शिदोरे यांनी नंतर मनसे पक्षाच्या स्थापनेत सहभाग घेतला.

 • अभय थिटे

  स्वतंत्र व्यावसायिक आणि ब्लॉगर , थिंक टँकचे सदस्य 

 • अभिराम दीक्षित

  वैद्यकीय व्यवसाय असलेले डॉ अभिराम दिक्षित सोशल मेडीयावर लोकप्रिय पण तथ्यपरक लिखाणामुळे लोकप्रिय आहेत.

 • अविनाश धर्माधिकारी

  सामाजिक कार्यकर्ता, पूर्व प्रशासकीय अधिकारी [IAS], चाणक्य मंडल या प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अशा विविध प्रकारे अविनाश धर्माधिकारी महाराष्ट्राला परिचित आहेत.

 • अश्विनी मयेकर

  मुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी.
  भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.

 • अशोक कुकडे

  लातूर येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवेचा आदर्श उभे करणारे डॉ. कुकडे आपल्या सौम्य पण स्पष्ट विचारांच्या साठी व पक्ष आणि मतभेद ओलांडून स्नेहपूर्वक संपर्कासाठी महाराष्ट्रात ओळखले जातात.

 • आशिष चांदोरकर

  सक्रीय पत्रकार आशिष चांदोरकर सध्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये कार्यरत आहेत.

 • ओंकार दाभाडकर

  डिजिटल मार्केटिंगमध्ये व्यवसाय, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय बदलांवर दिशा २०२५ ह्या संस्थेमार्फत कार्य सुरु. Participatory Democracy आणि आर्थिक कारणांमुळे निर्माण होणारे जातीय/धार्मिक/वांशिकद्वेष  - हे २ प्राधान्याचे विषय.

 • कुमार सप्तर्षि

  सामाजवादी  विचारवंत कुमार सप्तर्षि महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. सामाजिक कार्यात त्यांची कारकीर्द प्रदीर्घ व सातत्यपूर्ण आहे.

 • चिंतामण पाटील

  जळगाव तरुण भारतात १९९६ ते २००७ पर्यंत संपादकीय विभागात विविध जबाबदाऱ्या, गावाकडच्या गोष्टी हे स्तंभलिखाण. कृषी पत्रकारीता व संघाच्या ग्रामविकास विभागाच्या विविध उमक्रमात सहभाग. सध्याचा व्यवसाय शेती.

 • डॉ देगलूरकर

  डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर महाराष्ट्रातील इतिहास व पुरातत्व विषयातील नामांकित संशोधक आहेत.

 • डॉ अशोक मोडक

  डॉ. अशोक मोडक

 • डॉ कुमार शास्त्री

  डॉ. कुमार शास्त्री

 • देविदास देशपांडे

  टाइम्स वृत्तपत्र समूहात पत्रकारिता केलेले श्री. देविदास देशपांडे सध्या मुक्त पत्रकार आहेत.

 • दिलीप धारुरकर

  मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारुरकर त्यांच्या प्रभावी लेखनशैली साठी प्रसिद्ध आहेत.

 • प्रदीप नाईक

  संघाचे कार्य करून आपला साहित्याचा व वाचनाचा छंद जोपासणारे श्री. प्रदीप नाईक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.

 • प्रशांत आर्वे

  इतिहास विषयात एम. ए. ला सुवर्णपदक मिळवलेले श्री. प्रशांत अरुण आर्वे चंद्रपूर येथे अध्यापनाचे काम करतात. मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक सच्चीव आहेत. सातत्याने इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रीय लेखन, ऐतिहासिक कथाकथन, अशा अनेक कार्यात आघाडीवर असलेल्या श्री आर्वेंनी ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या आयोजनात महत्वाचा सहभाग दिला आहे.  

 • प्रसाद जोशी

  स्वतंत्र व्यावसायिक आणि ब्लॉगर , थिंक टँकचे सदस्य 

 • भाऊ तोरसेकर

  ज्यांच्या प्रखर लेखणीने पारंपारिक पत्रकारितेतून प्रारंभ करून वेब मेडियामध्ये तितक्याच सहजतेने प्रवेश केला अशा मोजक्या ज्येष्ठ पत्रकारांपैकी श्री. भाऊ तोरसेकर आहेत.

 • माधव भांडारी

  माधव भांडारी

 • मिलिंद बाम

  वैचारिक अस्पृश्यता न बाळगणारा वाचक. मतभेद आणि परमतसहिष्णुता हे हिंदुत्वाचे वेगळेपण आहे यावर श्रद्‍धा.

 • रमेश पतंगे

  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश पतंगे हे सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक सदस्य आहेत. साप्ताहिक विवेक चे प्रदीर्घ काळ संपादक राहिले आहेत. सिद्धहस्त लेखक तथा विचारवंत श्री पतंगेंचा सामाजिक विषयांचा व आन्दोलनांचा सखोल अभ्यास आहे.

 • रवींद्र गोळे

  साप्ताहिक विवेक चे सह संपादक श्री रवींद्र गोळे २००३ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. 'दीपस्तंभ' हे दलित उद्योजकांच्या यशोगाथा सांगणारे पुस्तक, 'आयाबाया' हे भटके विमुक्त समाजातील महिलांचे व्यक्तिचित्रण करणारे पुस्तक, यासह ८ विविध सामाजिक विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य' व इतर काही विशेष ग्रंथांचे हि त्यांनी संपादन केले आहे.  सध्या ते समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.

 • राजेश कुलकर्णी

  सोशल मेडियामध्ये अंधश्रद्धा व जातीयवाद यांच्याविरूद्ध सातत्याने लेखन करणा-या मोजक्या लेखकांपैकी राजेश कुलकर्णी एक आहेत. त्याचबरोबर ते रोजच्या घडामोडींसह विविध विषयांवर त्यांच्या खुमासदार शैलीत भाष्य करत असतात.”

 • विश्वंभर चौधरी

  नव्या पिढीतील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक श्री. विश्वंभर चौधरी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सहभागी राहिलेले आहेत.

 • शेफाली वैद्य

  सोशल मेडिया वर लिखाणात प्रभुत्व मिळवलेल्या मोजक्या अप्रचलित लेखकांपैकी एक शेफाली वैद्य आपल्या खुमासदार लेखन शैली साठी  लोकप्रिय आहेत.

 • श्रीकांत उमरीकर

  बी. ई. इलेक्ट्रिकल चे शिक्षण घेतलेले श्रीकांत अनंत उमरीकर हे व्यवसायाने ग्रंथ प्रकाशक आहेत कारण तो त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. जन शक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून  विविध पुस्तके प्रकाशित करतानाच ते सामाजिक आंदोलनात अग्रेसर आहेत. शेतकरी संघटने सह विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत श्री. उमरीकरांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वांग्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे. Quest for freedom या ब्लॉग च्या माध्यमातून नियमित पणे त्यांचे लेख २०११ पासून प्रकाशित होत असतात. 

 • शैलजा शेवडे

  विविध दैनिके व मासिकांमधून दर्जेदार व रुचीपूर्ण ललित लिखाणासाठी शैलजा शेवडे सुपरिचित आहेत.

 • संजय सोनवणी

  मराठी विश्वातील आजचे आघाडीचे लेखक श्री. संजय सोनवणी यांचे आजपर्यंत जवळपास ८० पुस्तके व ५०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. ब्लॉगवर ही अत्यंत सक्रीय असलेले श्री. सोनवणी यांचे लेखन वेब दुनियेत भरपूर चर्चेचा विषय ठरलेले आहे.  

 • सतीश गुंडावार

  माहिती तंत्रज्ञान व्यवसायिक व सुप्रसिद्ध ब्लॉगर 

 • सुनील दांडेकर

  लेखक मेक्यानिकल  इंजीनियर आहेत , मागील 35 वर्षा पासून अनेक नामवंत कंपन्यांचा अनुभव त्यांना विशेषत्वाने आहे॰

 • सुनीला सोवनी

  राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनीला सोवनी लेखक आहेत. त्यांनी संवाद माध्यम सेवा या फिचर सेवेचे दीर्घकाळ संचालन केले आहे.

 • सुरेश (भय्याजी) जोशी

  सुरेश (भय्याजी) जोशी